सौ. ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे या शिरूर नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहराची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मूलभूत नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकास या उद्दिष्टांसह त्या शिरूरच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.
माझी वसुंधरा अभियानातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासह विविध विकासात्मक उपक्रमांमधून शिरूर नगरपरिषदेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, नागरिकांचा विश्वास आणि विकासाची नवी दिशा अधिक बळकट झाली आहे.