
santosh shitole
नागरिक अभिप्रायशिरूरच्या "लेडी तुकाराम मुंडे " नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे तुमच्या सामाजिक जाणिवेला सलाम !!
दुर्दैवाने आज सगळीकडे अन्न भेसळ वाढत असल्यामुळे, भेसळयुक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. सकाळी उठून अमृत म्हणून जे दूध पितो त्या दुधापासून तसेच खडू मिसळलेल्या पिठापासून ते कृत्रिमरित्या पॉलिश केलेल्या तांदळापर्यंत आणि रासायनिक घटक असलेल्या मसाल्यांपर्यंत, जेवणानंतर आवडीने खाणाऱ्या आईस्क्रिम पर्यंत भेसळ शांतपणे आणि धोकादायकपणे दैनंदिन जीवनात शिरली आहे.
आजची तुमची धडक मोहीम ही शिरूर शहर व आजूबाजूच्या अंगण वाड्यातील लहाण जीवांच्या अन्नातील भेसळ तर थांबवेलच आणि शिरूरकरांना त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न यावर विचार करायला भाग पाडेल हे मात्र नक्की !!
आपण आज जे निर्भीडपणे सामाजिक कर्तव्य पार पाडले ते खरोखर प्रशंसनीय आहे .





